#MaharashtraPolitics : महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

#MaharashtraPolitics : महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

शिवसेना आणि आघाडी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबरला सविस्तर चर्चा होणार असल्याची माहितीही सेनेकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला अखेर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर शिवसेनेनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठीचा दावा केला. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप पाठिंब्याचं अधिकृत पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला काही वेळ हवा अशी मागणी सेनेकडून करण्यात आली. पण त्यासाठी राज्यपालांकडून नकार देण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद देत ही माहिती दिली आहे. दरम्यान, यासगळ्यावर शिवसेना आणि आघाडी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबरला सविस्तर चर्चा होणार असल्याची माहितीही सेनेकडून देण्यात आली आहे.

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

एकीकडे आता सत्तेचा हा तिढा सुटण्याची शक्यता असताना आता मुख्यमंत्री कोण होणार याबदद्ल चर्चा सुरू झाली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी काही नावं पुढे येतायत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. पण, महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री व्हावे असा जोर शिवसेनेच्या नेत्यांकडून धरण्यात आला आहे. पण यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पण सत्ता वाटपामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि अंतर्गत मतभेद रोखण्यासाठी शिवसेना सगळ्यांना समान आणि महत्त्वाची नावं पुढे आणणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळणार नाही.

महाशिवआघाडीची चर्चेमध्ये दोन उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला तर दुसरं मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण असं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यांच्या अंतर्गत काम करण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तयार होणार नाही.

महाशिवआघाडीचं सरकार आणण्यासाठी 20-20 असा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. पण यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त महत्त्व देण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणत्या तडजोडींवर सत्ता स्थापन होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बाळासाहेबांना वचन

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे वचन मी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेनेचे नेते संजय राऊत हेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वारंवार सांगत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. या सगळ्या घडामोडी घडत असताना मातोश्रीबाहेर आधी आदित्य ठाकरेंच्या नावाने बॅनर लागले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा दर्शवणारे बॅनर लागले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का या चर्चांना वेग आला.

अवघ्या राज्याचं लक्ष

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना कोणतं पद मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिन्ही प्रमुख नेत्यांकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 11, 2019, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading