काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी, राज्यपालांचा वेळ वाढवून द्यायला नकार

काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी, राज्यपालांचा वेळ वाढवून द्यायला नकार

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती पण राज्यपालांनी ती वेळ नाकारली, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती पण राज्यपालांनी ती वेळ नाकारली, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.आम्हाला आणखी दोन दिवसांचा वेळ हवा आहे, असंही ते म्हणाले.

पाठिंबा नाही

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा करण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. काँग्रेसच्या तळ्यात - मळ्यात भूमिकेमुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मिळवू शकली नाही. असं असलं तरी महाराष्ट्राला स्थिर आणि प्रामाणिक सरकार द्यायचं आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. आता महाराष्ट्रात सरकार स्थापनेची काय प्रक्रिया असेल ते पाहावं लागेल, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सतत संपर्कात आहोत,असंही ते म्हणाले.

या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येते की राज्यपाल आणखी वेगळी भूमिका घेतात ते पाहावं लागेल. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट येऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पत्र पोहोचलं नाही

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबदद्लचं काँग्रेसचं पत्र पोहोचू शकलं नाही, असं काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे म्हणाले. सत्तास्थापनेची चर्चा सुरूच राहील, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सांगितलं.

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला पण शिवसेनेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोघांचाही पाठिंबा नसल्याने सेनेचा दावा यशस्वी ठरला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता एकत्रित निर्णय घेतील, असं सांगितलं जातंय.

===================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 11, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading