...तर ते भाजपचं पाप, युतीच्या सत्ता नाट्यावर धनंजय मुंडेंची आक्रमक प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यातल्या सत्ता स्थापना नाट्यावर जोरदार टीका केली.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 07:53 PM IST

...तर ते भाजपचं पाप, युतीच्या सत्ता नाट्यावर धनंजय मुंडेंची आक्रमक प्रतिक्रिया

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जाताहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी आता भाजप-सेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यातल्या सत्ता स्थापना नाट्यावर जोरदार टीका केली. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांना भाजपचा फोन आला नाही. पण काँग्रेसच्या आमदारांना फोन गेला असल्याची माहिती कानावर आली. असं असेल तर भारतीय जनता पार्टी हे खूप मोठं पाप करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट कौल दिला असताना विरोधी पक्षाचे आमदार तुम्हाला फोडावे लागतात आणि सत्ता स्थापन करावी लागते. म्हणजे हे काय चालू आहे महाराष्ट्रात' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली आहे.

निवडणुकीच्या आधीही फोडाफोडीचं राजकारण निवडणुकीनंतरही ते राजकारण अशी भयंकर परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर निर्माण झाली आहे.  भाजप-सेनेला जनतेने कौल दिला असला तरीही सत्तेच्या वाटण्यासाठी दोन्ही पक्ष भांडत आहेत असा आरोप केला त्यांनी केला आहे. गोड बातमी देणार असं दोन्ही सांगतात पण दोन्हीही पक्ष किती कडू बोलत आहेत अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

इतर बातम्या - फोडाफोडीच्या राजकाणाची काँग्रेसलाही धास्ती, शिवसेनेपाठोपाठ आमदारांना हलवलं!

मुख्यमंत्रिपदावर बोलणार असाल तरच बोला, नाही तर फोन करू नका. काहीच ठरलं नव्हतं, तर मग चर्चा तरी कशाला करायची असं शिवसेनेनं भाजपला निक्षून सांगितलंय. अशी तणावाची परिस्थिती असताना भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार हे दररोज पत्रकारांना लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल असं सांगत आहेत. गेले काही दिवस ते गोड बातमी, गोड बातमी असं सांगत आहेत मात्र गोड बातमी काही मिळत नाहीये. या सगळ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

Loading...

थोरात म्हणाले, सत्ता स्थापनेचा जो पोरखेळ सुरू आहे त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरत काँग्रेसमध्ये फोडाफोडीचा प्रयत्न करातेहत. मुनगंटीवार हे दररोज गोड बातमी मिळेल असं सांगतात. मात्र गोड बातमी मिळत नाहीये. कसली गोड बातमी, भाजपने तर महाराष्ट्राचं मॅटर्निटी हॉस्पिटल केलं अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

मोठी बातमी - धक्कादायक! 6 हल्लेखोरांनी चहूबाजूने झाडल्या अंदाधुंद गोळ्या, युवकाचा मृत्यू

...म्हणून सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या, जयंत पाटलांचा आरोप

'आमच्या पक्षात जी काय फुटाफुटी व्हायची ती आधीच झाली आहे. त्यामुळे आता आमचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेनसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेच्या पेचावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ही कोंडी का निर्माण झाली, यावरही भाष्य केलं आहे.

'आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटा मिळावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मात्र आधी जे ठरलंय ते भाजपकडून देण्यात येत नाही. यामुळेच सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत,' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्याची एकही संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सोडत नसल्याचं दिसत आहे.

'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार'

'अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चिपळुणमार्गे कोकणात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देणार आहे. आम्ही राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे,' असं म्हणत जयंत पाटील यांनी आगामी काळात राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

इतर बातम्या - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...