मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू

अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 05:11 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू

मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरमध्ये धडक झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. भर दिवसा रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे काही वेळ वाहनांची गर्दी रस्त्यावर पाहायला मिळाली.

भरधाव मालवाहू ट्रकने मागून ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमधील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमीवरही उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - ब्लॅकमेलिंग चालणार नाही, अडीच वर्षांचा मुख्यमंत्री द्या - शिवसेना

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस सध्या संपूर्ण अपघाताची चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. नेमका अपघात कसा झाला आणि यामध्ये कोणाची चूक होती याचा तपास पोलीस करत आहेत. तर अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...