कराड, 07 नोव्हेंबर : शुल्लक कारणांतून तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचे आणि त्यातून गुन्हा घडल्याचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. असाच एक धक्कादायक प्रकार साताऱ्यात समोर आला आहे. कराड इथल्या आगाशिवनगरमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे 6 हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सहा हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये विकास उर्फ विकी लाखे याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सहा जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे विकी प्रचंड गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा हल्लेखोरांनी केला गोळीबार केला. इतर बातम्या - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू भर रस्त्यामध्ये विकीवर 6 तरुणांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. या सगळ्यामुळे परिसरात तरुणांना पोलिसांची भीती नसल्याचं समोर येतं. घटना झाल्यानंतर स्थानिकांकडून पोलिसांनी प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आता प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, विकीला का मारण्यात आलं याचा तपास पोलीस करत आहेत. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सगळ्यांची कसून चौकशी करण्यास सुरूवात केला आहे. तर विकीला अशा प्रकारे गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. इतर बातम्या - ब्लॅकमेलिंग चालणार नाही, अडीच वर्षांचा मुख्यमंत्री द्या - शिवसेना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







