मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Navi Mumbai Election: नवी मुंबई मनपा निवडणूक मविआ एकत्रित लढणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

Navi Mumbai Election: नवी मुंबई मनपा निवडणूक मविआ एकत्रित लढणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

Navi Mumbai Municipal Corporation Election 2022: आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपला शह देण्यासाठी मविआ एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Election 2022: आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपला शह देण्यासाठी मविआ एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Election 2022: आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपला शह देण्यासाठी मविआ एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी मुंबई, 16 डिसेंबर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा (Municipal Corporation elections) कार्यक्रम येत्या महिन्याभरात कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईत (Navi Mumbai) भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंकणात उतरणार आहे. (MVA will contest Navi Mumbai Municipal Corporation election together)

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नवी मुंबईतील स्थानिक पातळीवरील नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी नवी मुंबई मनपा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

वाचा : 'या' निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

काय असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निडवणूक लढणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे. नवी मुंबईत सध्याच्या जागा 111 आहेत. या निवडणुकीत आणखी 10 जागांची भर पडणार आहे. त्यामुळे 121 ते 122 जागा होतील असा अंदाज आहेत. यापैकी शिवसेना 75 ते 80 जागा, राष्ट्रवादी 20 ते 25 जागा आणि काँग्रेस 18 ते 22 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांच्या नवी मुंबईतील नेत्यांनी तयार केलेला हा एक टेन्टेटिव्ह फॉर्म्युला आहे. मात्र, अद्याप या फॉर्म्युल्यावर कुठल्याही नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि शिक्कामोर्तब केलेला नाहीये.

वाचा : उद्धव ठाकरेंनी गद्दारांना दाखवला बाहेरचा रस्ता, रामदास कदम यांना मोठा धक्का

2024 ला सुद्धा हेच सरकार येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार : जितेंद्र आव्हाड

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडण्याच्या तारखा भाजपकडून जाहीर करण्यात येत असतानाच काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी खाजगीत केलेल्या एका चर्चेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी सरकारबाबत विधान केलं आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. तसं पहायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फारसं अंतर नाहीये. पुण्यात शरद पवरांनी आपल्या मित्रांसोबत बोलताना सांगितलं... एक खाजगीतलं सांगतोय, शरद पवार म्हणाले, 2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील."

कुठल्याही गोष्टीत शरद पवार हे उद्धव ठाकरेंवर दबाव टाकतायत असं मी कधीही बघितलं नाही. त्यांचं असंस म्हणणं असतं की, शरद पवार हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करावेच लागतील. तो मुख्यमंत्रिपदाचा जो आदर आहे तो दिलाच पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

First published:

Tags: BJP, Election, NCP, Shiv sena, काँग्रेस