मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का, गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर

रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का, गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर

Big decision of Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रामदास कदम यांना एक मोठा धक्का बसला आहे.

Big decision of Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रामदास कदम यांना एक मोठा धक्का बसला आहे.

Big decision of Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रामदास कदम यांना एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना त्यांचे वादग्रस्त ऑडिओ क्लीप प्रकरण (Controversial viral audio clip) आता चांगलेच भोवल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

वाचा : OBC Reservation च्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, निवडणुका पुढे ढकलणार!

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या

1) राजू निगुडकर - उपजिल्हाप्रमुख,उत्तर रत्नागिरी

2) किशोर देसाई - विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा

3) ऋषिकेश गुजर - तालुकाप्रमुख, दापोली तालुका

4) संतोष गोवले - तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका

5) संदीप चव्हाण - शहरप्रमुख, दापोली शहर

6) विक्रांत गवळी - उपशहरप्रमुख, दापोली शहर

विधान परिषदेचीही जागा गमावली

विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेनं एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपला रसद पुरवणाऱ्या रामदास कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेनं मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदेंना उमेदवारी दिली आहे. सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असं आश्वासनं दिलं होतं. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी दिली.

वाचा : आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रविण दरेकरांना नोटीस

"मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही"

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. या घटनेनंतर रामदास कदम हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही उपस्थित नव्हते, तब्येतीचं कारण सांगत रामदास कदम दसरा मेळाव्याला अनुपस्थित राहिले होते. मात्र, 17 नोव्हेंबर रोजी रामदास कदम हे शक्तीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

रामदास कदम म्हणाले होते, मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेबांमुळेच. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. मी कडवा शिवसैनिक आहे. शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे, गौप्यस्फोट करणार आहे.

First published:

Tags: Ramdas kadam, Ratnagiri, Shiv sena, Uddhav thackeray