मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Bank Election: मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यास कारवाईचा इशारा

Mumbai Bank Election: मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; बंडखोर उमेदवारांनी माघार न घेतल्यास कारवाईचा इशारा

Shiv Sena, BJP, NCP together in election: शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत एकत्र आल्याचं पहायला मिळत आहेत.

Shiv Sena, BJP, NCP together in election: शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत एकत्र आल्याचं पहायला मिळत आहेत.

Shiv Sena, BJP, NCP together in election: शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत एकत्र आल्याचं पहायला मिळत आहेत.

मुंबई, 16 डिसेंबर : मुंबै बँकेच्या निवडणुकीत (Mumbai Bank Election) शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र (Shiv Sena, BJP, NCP together in Election) आल्याचं पहायला मिळत आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विधान परिषदेच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्याशी चर्चा झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही तर तिन्ही पक्षांकडून थेट बंडखोरांवर पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरांवर बडतर्फीच्या कारवाईचा इशारा देताच शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेना पक्षाच्या इशाऱ्यानंतर मुंबै बँक निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम या तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

बंडखोर उमेदवार कमलाकर नाईक यांनी त्यांची उमेदवारी आज मागे नाही घेतली तर त्यांच्यावर पक्षांतर्गत मोठी करवाई करण्यात येणार आहे. कमलाकर नाईक यांनी बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

वाचा : उद्धव ठाकरेंनी गद्दारांना दाखवला बाहेरचा रस्ता, रामदास कदम यांना मोठा धक्का

मुंबै बँक निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार

अभीजीत घोसाळकर

सुनिल राऊत

अभीजीत अडसूळ

शिल्पा सरपोददार

मुंबै बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. नव्या संचालक मंडळावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, नितीन बनकर, सुनील राऊत, नंदकुमार काटकर, शिल्पा सरपोतदार, संदीप घनदाट या नेत्यांची नियुक्ती बिनविरोध होणार असल्याचं दिसून येत आहे.

आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रविण दरेकरांना नोटीस

मुंबै बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली आहे. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले आहे.

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

या नोटीस संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतते प्रविण दरेकर याना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, मला तशा पद्धतीची नोटीस आलेली नाहीये. संस्थेला आली असेल तर त्याचे उत्तर ते देतील.

First published:

Tags: BJP, Election, NCP, Shiv sena