मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा हेच सरकार येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार : जितेंद्र आव्हाड

शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा हेच सरकार येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार : जितेंद्र आव्हाड

 सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत

सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत

Jitendra Awahad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 साली सुद्धा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी मुंबई, 9 डिसेंबर : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) पडण्याच्या तारखा भाजप (BJP)कडून जाहीर करण्यात येत असतानाच आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) खाजगीत केलेल्या एका चर्चेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी सरकारबाबत विधान केलं आहे.

2024 ला सुद्धा हेच सरकार

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. तसं पहायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फारसं अंतर नाहीये. पुण्यात शरद पवरांनी आपल्या मित्रांसोबत बोलताना सांगितलं... एक खाजगीतलं सांगतोय, शरद पवार म्हणाले, 2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील."

कुठल्याही गोष्टीत शरद पवार हे उद्धव ठाकरेंवर दबाव टाकतायत असं मी कधीही बघितलं नाही. त्यांचं असंस म्हणणं असतं की, शरद पवार हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करावेच लागतील. तो मुख्यमंत्रिपदाचा जो आदर आहे तो दिलाच पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

वाचा : मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् 

त्याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वॉर्ड रचनेवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाण्यात सत्ताधारी शिवसेना मनमानी करते. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वॉर्ड रचनेत बदल केले. आपल्या सोईनुसार शिवसेनेने वॉर्ड रचना केली असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

भाजपला मोठं खिंडार पडणार, भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरच घरवापसी होणार

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक म्हणाले होते, सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, देवेंद्रजी वारंवार भविष्यवाणी करण्यात येत आहे. चंद्रकातं पाटील स्वप्न पाहून उठत राहिले. आता नारायण राणे... 1999 मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपत आले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत परंतु अजूनही नवस पूर्ण झालेला नाही. त्यांनी लक्षात घ्यावं ही सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक पुढे म्हणाले, त्यांना हे ही सांगतो लवकरच भाजपमध्ये असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाजप हताश आहे. एनसीपी, काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस, एनसीपीतून भाजपमध्ये गेलेल्यांना रोखण्यासाठी सरकार पडणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.

First published:

Tags: Jitendra awhad, NCP, Uddhav thackeray