जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तेव्हा एका जागेसाठी युती तोडली अन् आज..; जागा वाटपावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला!

तेव्हा एका जागेसाठी युती तोडली अन् आज..; जागा वाटपावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला!

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 18 मार्च : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवेल तर शिवसेना 48 जांगावर लढणार असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य व्हायरल झालं होतं. या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. शिंदे गटाला स्वाभिमान उरला नाही. 2014 ला एका जागेवरून शिवसेनेने भाजपसोबत असलेली युती तोडली होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानत नसल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागाच मिळणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं शेतीच्या नुकसानावरून टीका  तोंड उघडायला लावू नका नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होतील असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नकुसान झाला आहे. केळी, आंबा, हारभारा, कांदा या पिकाला अवकाळी पवसाचा मोठा फटका बसला आहे. यावरून देखील संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं  काही देणं-घेणं नसून ते फक्त राजकारण करतात असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात