जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपाला 'ती' चूक भोवणार; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांची मोठी भविष्यवाणी

भाजपाला 'ती' चूक भोवणार; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांची मोठी भविष्यवाणी

संजय राऊत

संजय राऊत

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 15 फेब्रुवारी : संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. महाविकास आघाडी पूर्ण मार्काने पास होईल, मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत तो दिसून येईल. अंधेरीमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. भाजपाने मतदारांना कायम गृहीत धरले आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना आता गृहीत धरता येणार नाही. याचा फटका भाजपला बसेल. सामान्य माणूस भाजपावर नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीसांना टोला  दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आपल्याला अटक करण्यात येणार होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अटक करणार नव्हतं. महाविकास आघाडी असलं घाणेरडे राजकारण करत नाही. आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आणि सुसंस्कृत होते, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे. हेही वाचा :  संभाजीराजे कडाडले, थेट भाजप नेत्यांवर केला घणाघात, शिवस्मारकाबद्दल विचारला थेट सवाल

News18लोकमत
News18लोकमत

नाशिक महापालिकेवर भगवा   दरम्यान त्यांनी यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. पैशांचा एवढा वारेमाप वापर राज्यात कधी पाहिला नव्हता. काहीही झालं तरी नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गती मिळाल्यानंतर आम्ही देखील प्रचारासाठी पुण्यात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात