जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / संभाजीराजे कडाडले, थेट भाजप नेत्यांवर केला घणाघात, शिवस्मारकाबद्दल विचारला थेट सवाल

संभाजीराजे कडाडले, थेट भाजप नेत्यांवर केला घणाघात, शिवस्मारकाबद्दल विचारला थेट सवाल

 थोड्याच दिवसात सरकारविरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला

थोड्याच दिवसात सरकारविरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला

थोड्याच दिवसात सरकारविरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

इंदापूर, 15 फेब्रुवारी : भाजपवाली लोकं फसवी आहे. लवकरच या सरकार विरोधात मोठा लढा उभारणार आहे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडाच्या विकासावरुन सरकारवर ताशेरे ओढले. इंदापूर मधील भिगवण येथे अखिल भारतीय मराठा महासंच्या वतीने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संभाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरुन सरकारवर जोरदार टीका केली. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray : आज शिंदे गटाची बारी, सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय?) ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा वर्षापूर्वी जलपूजन पार पडले मात्र अद्याप ते काम झाले नाही.त्यावेळी 3 हजार कोटी रूपयाचे ते बजेट होते आता ते 30 हजार कोटी रुपयाचे झाले असेल कोठून पैसे आणणार आहेत? असा सवाल संभाजीराजेंनी केला. ‘हा लोकांना फसवण्याचा प्रकार असून तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर जिवंत स्मारक असणाऱ्या गडकोट किल्ल्यांसाठी द्या’ अशी मागणीही संभाजीराजेंनी केली. ‘आता मी दमलो असून थोड्याच दिवसात सरकारविरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून रायगडावर फक्त सव्वा कोटी रुपये खर्च केले. प्रत्येक जण रायगडाचे नाव घेतो रायगडाची दुरुस्त झाली असं सांगतं परंतु कोणत्या सरकार त्यावरती खर्च करत आहे अशी खंत संभाजीराजांनी बोलून दाखवली. (पंतप्रधान मोदींवर ‘सैफ अकादमी’ उद्घाटनावरून आधी टीका, आता उद्धव ठाकरे तिकडेच गेले) ‘सध्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तसेच माजी मुख्यमंत्र्यांना 50 ने 100 पत्र लिहिले आहेत आणि सांगितले आहे की सी पोर्ट टुरिझम करा परंतु त्यांना ते करण्यासाठी वेळ नाही असे म्हणत त्यांनी आजी आणि माजी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, ‘जे जे बिघडलेत त्यांना निट करण्यासाठी स्वराज्यची स्थापना केली आहे. स्वराज्याच्या माध्यमातून जे जे बिघडलेले आहे त्यांना सरळ कसं करायचे हे स्वराज्य ने ठरवले आहे, असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात