मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'शिंदे गटातील नेत्यासाठी नारायण राणेंचं केंद्रीय मंत्रिपद जाणार' संजय राऊतांचा मोठा दावा

'शिंदे गटातील नेत्यासाठी नारायण राणेंचं केंद्रीय मंत्रिपद जाणार' संजय राऊतांचा मोठा दावा

कधीकाळी मोदींवरही टीका करत होता. कोण आहात तुम्ही. आमच्या नादाला लागू नका, तर तुम्हाला कळेल, आम्ही काय आहे

कधीकाळी मोदींवरही टीका करत होता. कोण आहात तुम्ही. आमच्या नादाला लागू नका, तर तुम्हाला कळेल, आम्ही काय आहे

कधीकाळी मोदींवरही टीका करत होता. कोण आहात तुम्ही. आमच्या नादाला लागू नका, तर तुम्हाला कळेल, आम्ही काय आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 07 जानेवारी : 'माझ्या माहितीप्रमाणे राणेंचं केंद्रीय पद जाणार आहे. आताा एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचं आहे, यांचा परफॉर्मन्स शुन्य आहे. पीएमओमध्ये आमची सुद्धा माणसं असतात', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल नवीन भाकित वर्तवलं आहे.

संजय राऊत आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं तर ते चप्पलेनं मारतील, असं वक्तव्य राणेंनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत कमालीचे संतापले.

'माझ्या माहितीप्रमाणे राणेंचं केंद्रीय पद जाणार आहे. आताा एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचं आहे, यांचा परफॉर्मन्स शुन्य आहे. पीएमओमध्ये आमची सुद्धा माणसं असतात. पण मला त्यात पडायचं नाही. तुम्ही ज्या पक्षात गेला तिथे इमान राखा, आमच्यावर आरोप करू नका, पण निष्ठा बांडगा हा मोठ्या बाग देतो, पण तुम्ही आता मर्यादा सोडली. आम्ही अजून हात सोडले नाही. तुम्ही आमचं काय उखाडणार, तुम्ही आहात कोण, तू काय करणार, लाचार माणूस आहे. 10 पक्ष बदलतो, अशी टीकाही राऊतांनी केली.

'नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना भेटणार ही चांगली गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात पक्ष सोडल्यानंतर मी नारायण राणेंला भेटलो नाही. मी बेईमान, गद्दारांना भेटत नाही. त्यांची उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली आहे. आताच उद्धव ठाकरे आणि माझं बोलणं झालं. ते राणेंच्या विधानावर हसत होते. सुरुवात कुणी केली, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर घाणरेडे शब्दात सुरुवात केली. आमच्यावर संस्कार आहे. तुम्ही पक्ष सोडला, तुम्ही त्या मार्गाने शांतपणे जा, आमचं काही म्हणणं आहे का. तुमच्या कर्माने जगा आणि कर्माने मरा, आदित्य ठाकरेंवर किती घाणरेडे आरोप झाले, काय पुरावे आहे. तुम्ही तुमची मुलं कोणत्या भाषेत बोलताय. शरद पवारांना ज्ञान देत होता, कधीकाळी मोदींवरही टीका करत होता. कोण आहात तुम्ही. आमच्या नादाला लागू नका, तर तुम्हाला कळेल, आम्ही काय आहे. उगाच धमक्या, दादागिरी करू नका, आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं आहे. तु कधी कानफटात खाल्ली का, मोठी भाईगिरी दाखवतो, या दाखवतो, अशा इशाराही राऊतांनी राणेंना दिला.

(आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..)

'एकाच अधिवेशनात मुख्यमंत्री सह मंत्र्यावर आरोप झाले आहे. तरी सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर आरोप झाले आणि कोर्टाने ताशेरे जर ओढले तर त्यांना जावं लागलं. बॅरिस्ट अंतुले यांनाही मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. एका अधिवेशनात पुराव्यासह 6 मंत्र्यांवर आरोप झाले. पण ते ठोम्यापणे काम करत आहे. तुमचं तुम्ही पाहा, आमचं आम्ही पाहून असं काम सुरू आहे. तुमचं तुम्ही पाहा यामध्ये 40 आमदारांच्या पलिकडे नाही. या आमदारांना खूश करणे हे काम आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदलत चाललं आहे. 2024 ची तयारी सुरू आहे. त्याआधी सुद्धा तयारी होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. जर आमच्या न्याय व्यवस्थेवर दबाव आला नाहीतर हे बेकायदेशीर सरकार फेब्रुबारीपर्यंत राहणार नाही. हे सरकार व्हेटिंलटरवर आहे, कोर्टाने मास्क काढला तर हे राम, राम बोलो राम, म्हणावे लागेल, असंही राऊत म्हणाले.

जे आता पक्षातून निघून गेले आहे. ते डबकं आहे. डबक्यात बेडूक राहतो. पाऊस गेला ही बेडूक मरून जातात. हे सगळे भाजपमध्ये जातील. ही लोक आजचं मरण उद्यावर ढकलत आहे. हे आमदार अपात्र ठरवले जातील. जर नाही ठरवले तर कायद्याचा हा अवमान आहे. फेब्रुवारीपर्यंत निकाल लागला तर हे सरकार राहणार नाही, असंही राऊत म्हणाले.

(भावाने गुंडगिरी केली का, गरिबांची दुकानं का पाडली? गोपीचंद पडळकर म्हणाले...)

शिवसेना एकच आहे, एकच राहणार. गट तट हे राहणार नाही. बाळासाहेबांनी एक बिज लावले, त्यातून शिवसेनेच्या वट वृक्ष झाले. त्यातून बाहेर पडलेला पाला पाचोळा, कचरा घेऊन उचलून नेत आहे. त्या कचऱ्यातून मुख्यमंत्री भाषण करत आहेत. कचरा हा आग लावण्यासाठी असतो. यातून धूर फार काळ राहत नाही, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

काही लोक सोडून गेली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी डॅमेज व्हावे लागतात. पक्ष सोडून गेलेल्यांचा डीएनए तपासून पाहावा लागणार आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.

First published:
top videos

    Tags: Narayan rane, Sanjay raut, Shivsena