जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भावाने गुंडगिरी केली का, गरिबांची दुकानं का पाडली? गोपीचंद पडळकर म्हणाले...

भावाने गुंडगिरी केली का, गरिबांची दुकानं का पाडली? गोपीचंद पडळकर म्हणाले...

' उलट आम्ही पालिकेला सहकार्य केलं आहे. कुणाचं काहीही नुकसानं केलं नाही. झोपडपट्टी होती, जे कर्मिशियल होतं त्यावरच कारवाई केली आहे'

' उलट आम्ही पालिकेला सहकार्य केलं आहे. कुणाचं काहीही नुकसानं केलं नाही. झोपडपट्टी होती, जे कर्मिशियल होतं त्यावरच कारवाई केली आहे'

’ उलट आम्ही पालिकेला सहकार्य केलं आहे. कुणाचं काहीही नुकसानं केलं नाही. झोपडपट्टी होती, जे कर्मिशियल होतं त्यावरच कारवाई केली आहे'

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

**कोल्हापूर, 07 जानेवारी : ‘**गुंडगिरीचा काही विषय नाही, तुम्ही अतिक्रमण करता आणि गुंडगिरीची भाषा करतात. मुळ मालकाला महापालिकेनं नोटीस काढली होती. त्यामुळे कारवाई केली. उलट आम्ही पालिकेला सहकार्य केलं आहे’ असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भावाची जोरदार पाठराखण केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. या प्रकरणी ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली. असं काहीही झालं नाही. याच्या मुळामध्ये गेलं पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता झाला पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. नितीन गडकरी साहेबांनी याला मंजुरी दिली. पण रस्त्यावर अनेक अडचणी आहे. मागील महिन्याभरापासून अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. सांगली मिरज कुपवाड पालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांनी या भागातील नागरिकांनी अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले होते. पण या लोकांनी त्यांच्याशी वादावादी केली. त्यामुळे ती लोकं निघून गेली. शेवटी महापालिकेनं मुळ मालक ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावाने नोटीस काढली. 24 तासांच्या आत हे नोटीस काढा असं सांगितलं’ असा दावा पडळकरांनी केला. (रात्रीच्या अंधारात दुकानं-हॉटेल पाडली, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावावर आरोप) 16 डिसेंबरला नोटीस काढली, त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा नोटीस काढली. सांगली मिरज बस स्थानकासमोरचा हा प्लॉट आहे. तिथे खूप रहदरी असते. त्यामुळे कारवाई केली. ज्यावेळी अतिक्रमण हटवले तेव्हा पोलीस सुद्धा हजर होते. पण, पोलिसांनी माझ्याभावासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याबद्दल माहिती घेऊन न्यायालयात दाद मागणार आहोत, असंही पडळकर म्हणाले. गुंडगिरीचा काही विषय नाही, तुम्ही अतिक्रमण करता आणि गुंडगिरीची भाषा करतात. मुळ मालकाला महापालिकेनं नोटीस काढली होती. त्यामुळे कारवाई केली. उलट आम्ही पालिकेला सहकार्य केलं आहे. कुणाचं काहीही नुकसानं केलं नाही. झोपडपट्टी होती, जे कर्मिशियल होतं त्यावरच कारवाई केली आहे. कायदेशीर कारवाई केली आहे, असंही पडळकर म्हणाले. ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणांवर गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. (ठरलं! या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख) अखेर या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केलं. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण केली. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. या प्रमाणे 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात