जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात

आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

रायगड, 6 जानेवारी : दिवसेंदिवस अपघात होण्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून तर लोकप्रतिनिधींच्या वाहनांना अपघात होण्याच्या दोनचार घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका आमदाराच्या गाडीला अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. कसा झाला अपघात? आमदार योगेश कदम यांच्या गाडीला आज शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे.  सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम जातीने उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली .यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. आमदार योगेश कदम आणि त्यांचा ड्रायव्हर यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना काही वेळात मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. मात्र, त्यांच्या ड्रायव्हरला दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येते.

जाहिरात

दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत मुंडे यांनीच माहिती दिली. अपघातात धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचं बोनेट पूर्णपणे डॅमेज झालेलं दिसत आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. चक्काचूर झालेली ही गाडी BMW कंपनीची असल्याचे समोर आले आहे. ही लक्झरी कार BMW X7 आहे. या कारनेच धनंजय मुंडेचा अपघात झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात