नाशिक, 07 जानेवारी : ' राज ठाकरे यांना सभा घेऊ द्या, राज ठाकरेंना शिवसेना भवनासमोर सभा घ्यायची तर घेऊ द्या. शिवसेना भवनाविषयी सर्वांनाच प्रेम आहे. प्रत्येकाचा आत्मा तिकडे अडकला आहे. सभा घ्यायला कुणाची बंदी आहे का? जर पालिकेने त्यांना परवानगी दिली आणि देणारच आहेत सरकार त्यांचंच आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहेत सगळे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.
संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच, राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
राज ठाकरे यांना सभा घेऊ द्या, राज ठाकरेंना शिवसेना भवनासमोर सभा घ्यायची तर घेऊ द्या. शिवसेना भवनाविषयी सर्वांनाच प्रेम आहे. प्रत्येकाचा आत्मा तिकडे अडकला आहे. सभा घ्यायला कुणाची बंदी आहे का? जर पालिकेने त्यांना परवानगी दिली आणि देणारच आहेत सरकार त्यांचंच आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहेत, आम्ही रोज शिवतिर्थावर सभा घेतो त्यांच्या घरासमोर सभा घेत असतो.. घेऊ द्या त्यांना सभा. जर पालिकेने त्यांना परवानगी दिली आणि देणारच आहेत सरकार त्यांचंच आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहेत सगळे. परवानग्या आम्हाला मिळत नाही. आमची भीती आहे. ज्यांची सरकारला भीती नसते, त्यांना कुठेही लघुशंका करण्यासाठी परवानगी मिळते, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
(भावाने गुंडगिरी केली का, गरिबांची दुकानं का पाडली? गोपीचंद पडळकर म्हणाले...)
'नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना भेटणार ही चांगली गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात पक्ष सोडल्यानंतर मी नारायण राणेंला भेटलो नाही. मी बेईमान, गद्दारांना भेटत नाही. त्यांची उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली आहे. आताच उद्धव ठाकरे आणि माझं बोलणं झालं. ते राणेंच्या विधानावर हसत होते. सुरुवात कुणी केली, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर घाणरेडे शब्दात सुरुवात केली. आमच्यावर संस्कार आहे. तुम्ही पक्ष सोडला, तुम्ही त्या मार्गाने शांतपणे जा, आमचं काही म्हणणं आहे का. तुमच्या कर्माने जगा आणि कर्माने मरा, आदित्य ठाकरेंवर किती घाणरेडे आरोप झाले, काय पुरावे आहे. तुम्ही तुमची मुलं कोणत्या भाषेत बोलताय. शरद पवारांना ज्ञान देत होता, कधीकाळी मोदींवरही टीका करत होता. कोण आहात तुम्ही. आमच्या नादाला लागू नका, तर तुम्हाला कळेल, आम्ही काय आहे. उगाच धमक्या, दादागिरी करू नका, आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं आहे. तु कधी कानफटात खाल्ली का, मोठी भाईगिरी दाखवतो, या दाखवतो, अशा इशाराही राऊतांनी राणेंना दिला.
(आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..)
'माझ्या माहितीप्रमाणे राणेंचं केंद्रीय पद जाणार आहे. आताा एक नवीन गट स्थापन झाला आहे. त्यांना सामावून घ्यायचं आहे, यांचा परफॉर्मन्स शुन्य आहे. पीएमओमध्ये आमची सुद्धा माणसं असतात. पण मला त्यात पडायचं नाही. तुम्ही ज्या पक्षात गेला तिथे इमान राखा, आमच्यावर आरोप करू नका, पण निष्ठा बांडगा हा मोठ्या बाग देतो, पण तुम्ही आता मर्यादा सोडली. आम्ही अजून हात सोडले नाही. तुम्ही आमचं काय उखाडणार, तुम्ही आहात कोण, तू काय करणार, लाचार माणूस आहे. 10 पक्ष बदलतो, अशी टीकाही राऊतांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Narayan rane, Raj Thackery, Sanjay raut, Shivsena