जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे राऊतांकडून संकेत , गौप्यस्फोटानं खळबळ!

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे राऊतांकडून संकेत , गौप्यस्फोटानं खळबळ!

संजय राऊत

संजय राऊत

रविवारी नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 14 एप्रिल :  रविवारी नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांन केला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या दबावानं राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राऊतांनी काय म्हटलं?  संजय राऊत हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या दबावंन राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ‘ऐतिहासिक सभा होणार’  उद्या नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. सभा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र उद्याची सभा ऐतिहासिक होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, यावरून देखील राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. उद्याची सभा पहाण्यासाठी ते येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. आज संजय राऊत माजी मंत्री अनिल देशमुख यांची देखील भेट घेणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात