नागपूर, 24 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे जयंत पाटील यांना या अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवारांवरच नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांच्या या नाराजीपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदारही अजित पवारांवर नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
जयंत पाटील यांच्याविषयी अजित पवार यांची सभागृहातील भूमिका अनेक आमदारांना आवडलेली नाही. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून पक्षाच्या नेत्याची चूक असल्याचा भास करून दिला. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, असं अनेक आमदार खासगीमध्ये बोलत आहेत.
अजितदादांनी ते बाळकडू इतरांनाही द्यावं.. उदय सामंत यांची पवारांवर स्तुतीसुमनं, म्हणाले..
शरद पवारांचा फोन
शरद पवार हे सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे दिल्लीमधून शरद पवारांनी अजित पवारांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली, अशी माहिती समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसं न झाल्यानं शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातंय.
ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीची झाली का? भास्कर जाधवांनी दिला दुजोरा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Jayant patil, NCP, Sharad Pawar