नागपूर, 23 डिसेंबर : नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ठाकरे गटाचा राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख करण्यात आला, आता यावरून विरोधकांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मात्र या वक्तव्याला दुजोरा दिला आहे, होय राष्ट्रवादीचीच शिवसेना असं त्यांनी म्हटलं आहे.
विरोधकांकडून टीकेची झोड
दुसरीकडे मात्र विरोधकांकडून जयंत पाटलांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं नाही. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली लोकं नको झाली आहेत, आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसला सोडा असं त्यांना आम्ही सांगत होतो. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा असं आम्हाला म्हटल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
हेही वाचा : निलंबन जयंत पाटलांचं अन् शरद पवार अजित पवारांवर नाराज; थेट दिल्लीतून फोन म्हणाले...
राम कदम यांचा निशाणा
तर दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी देखील जयंत पाटलांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ही राष्ट्रवादीचीच शिवसेना आहे. ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारावर चालणारी आणि हिंदुत्व सोडलेली सेना असल्याची टीका राम कदम यांनी केली आहे. आता राम कदम यांच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Jayant patil, NCP, Shiv sena, Uddhav Thackeray