मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अजितदादांनी ते बाळकडू इतरांनाही द्यावं.. उदय सामंत यांची पवारांवर स्तुतीसुमनं, म्हणाले..

अजितदादांनी ते बाळकडू इतरांनाही द्यावं.. उदय सामंत यांची पवारांवर स्तुतीसुमनं, म्हणाले..

उदय सामंत यांची पवारांवर स्तुतीसुमनं, म्हणाले..

उदय सामंत यांची पवारांवर स्तुतीसुमनं, म्हणाले..

शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी, 24 डिसेंबर : बंडखोरी केल्यापासून शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांवर 50 खोके एकदम ओके, गद्दार अशी टीका केली जात आहे. याला सत्ताधारी पक्षही जशास तसे उत्तर देत आहे. मात्र, आज याच मुद्द्यावरुन शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर स्तुतीस्तुमनं उधळली. तर त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली. उदय सामंत आज रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री सामंत यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक

मला वाटतं हा क्रेझचा प्रश्न नाही, हा राजकीय संस्कृतीचा प्रश्न आहे. एकतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून दहा वर्षांपूर्वी बाहेर पडलो होतो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग असला पाहिजे. खरंतर खोके, गद्दार त्यांनी मला म्हटलं पाहिजे. परंतु, राजकीय खिलाडू वृत्ती काय असते? राजकारणात कशा पद्धतीने काम करायचे असतं तर हा आदर्श शरद पवार साहेबांनी आणि कालच्या अजित पवारांच्या वर्तणुकीतून अनेक मान्यवरांना कळला असेल. जे फक्त खोके आणि गद्दारीपर्यंत मर्यादित राहिले असतील त्यांनी हा अजित पवारांचा आदर्श घ्यावा. अजित पवार आणि उदय सामंत यांच्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले. तसेच आम्ही दोघांनी एकत्र फोटो काढला म्हणून काही मी त्यांच्याकडे गेलो नाही आणि त्यांनी आमच्याकडे यावे म्हणून चर्चा देखील झाली नाही. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. लोकशाहीमध्ये कोणी कुठचाही निर्णय घेतला तरी लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवार यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अजित दादांना माझी विनंती आहे. आपण जसे वागता तसे बाळकडू इतरांनाही द्यावे.

वाचा - ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीची झाली का? भास्कर जाधवांनी दिला दुजोरा!

सीमा प्रश्नावर बोलताना उदयसमन म्हणाले..

कर्नाटकामध्ये मंत्री नक्की जातील मी तर कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या जतमध्ये जाऊन आलो. अक्कलकोटमध्ये देखील जाणार आहे. परंतु, मी पूर्वीपासून सांगत आहे. माननीय अमित शाह यांनी एक बैठक घेतल्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे तंतोतंत त्या सूचनांचे पालन करीत आहेत. आमचा अंत कुणी पाहू नये. आम्ही आक्रमक नाही, अशातला भाग नाही. पण, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही अशी आमची जबाबदारी आहे तशी ती कर्नाटक सरकारची देखील आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी सामंजसपणे हा प्रश्न हाताळला पाहिजे, अशी आमची महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना विनंती आहे.

वाचा :  निलंबन जयंत पाटलांचं अन् शरद पवार अजित पवारांवर नाराज; थेट दिल्लीतून फोन म्हणाले...

संजय राऊत राजकारण करतायत : उदय सामंत

संजय राऊत यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले ते राजकारण करत आहेत. सीमा प्रश्न हा अडीच वर्षाचा किंवा तीन वर्षाचा नसून तो पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, तेव्हा काय केलं? चार महिन्यांमध्ये सीमा प्रश्नावर सरकारने जे काय उपाय करायचे ती ठोस उपाययोजना सरकारने केली आहे. केंद्र सरकारमध्ये देखील आमची चर्चा झालेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल आहे, तेथे मोठे वकील उभे करून महाराष्ट्राची भूमिका आम्ही मांडणार आहोत. जसं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांची एक इंच जमीनही देणार नाही. तशी आम्ही तिथली जमीन घेऊन दाखवू. सुप्रीम कोर्टाच्या आलेल्या न्यायाने एक इंच जमीन त्यांच्याकडे जाणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

..तर जिल्हा परिषद गटात एवढी गर्दी झाली नसती : सामंत

खोके बिके काय जर असतं तर एका जिल्हा परिषद गटातली एवढी गर्दी या ठिकाणी झाली नसती. त्यांना जे काय बोलायचे ते बोलू दे महाराष्ट्रात नगरपरिषदेवर जे बोके बसले होते, त्यांनाच यांची फिकीर आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी राऊत यांच्या आरोपांवर दिली. तर जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु, राष्ट्रवादीची शिवसेना झाली आहे की उरलेल्या शिवसेनेची राष्ट्रवादी झाली आहे हे जयंत पाटीलच चांगलं सांगू शकतात, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लावला.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar