जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा  गौप्यस्फोट

शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

शुक्रवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र यानंतर आता शिंदे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ Buldana,Buldana,Maharashtra
  • Last Updated :

बुलडाणा, 18 फेब्रुवारी :  शुक्रवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानं शिंदे गटात उत्साहाच वातावरण आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिदे गटाने आपला मोर्चा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळवल्याचं दिसून येत आहे. राज्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदे गटात दिसतील असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. नेमकं काय म्हटलं जाधव यांनी?   राज्यात राजकीय भूकंप होईल असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलले होते. त्यावर उत्तर देताना खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले की राजकीय भूकंप नक्की होईल, मात्र तो असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गट आणि भाजपमध्ये सामील झालेले दिसतील. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. हेही वाचा :  Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदेंची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली! येत्या काही दिवसातच… ठाण्यात राष्ट्रवादीला धक्के ठाण्यातील ठाकरे गटाच्या जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  मात्र आता शिंदे गटाकडून ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का देण्याचं काम सुरू आहे. ठाण्यातील अनेक नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटानं आपला मोर्चा हा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं वळवला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात