मुंबई, 17 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची बैठक बोलवतील. या बैठकीमध्ये सगळ्यात आधी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘निवडणूक आयोगाचा निकाल स्वीकारून…’, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भविष्यासाठी सल्ला 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखाचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका या प्रलंबित आहेत, याच निवडणुका घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सगळ्यात आधी बैठक बोलवावी लागेल. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे, तसंच आपण या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.