जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वज्रमूठ सभेत अजितदादांचं भाषण नाही? पडद्यामागे वेगवान घडामोडी

वज्रमूठ सभेत अजितदादांचं भाषण नाही? पडद्यामागे वेगवान घडामोडी

अजित पवार

अजित पवार

उद्या मविआची नागपुरात वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 15 एप्रिल : उद्या मविआची नागपुरात वज्रमूठ सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी नागपुरात दाखल होताच माजी मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही सभा ऐतिहासीक होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. या सभेला मविआचे सर्वच नेते हजर राहणार आहेत. मात्र प्रत्येक पक्षातील दोनच नेत्यांना बोलायची संधी मिळणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत अजित पवार बोलणार का असा प्रश्ना उपस्थित होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

देशमुखांची प्रतिक्रिया  दुसरीकडे अनिल देशमुख यांनी देखील याबाबत माहिती दिल आहे. उद्याची सभा जंगी होणार आहे. प्रत्येक पक्षाच्या दोघांचे भाषण होईल. कोण बोलणार हे उद्या ठरणार आहे. संजय राऊत हे या सभेसाठीच नागपुरात आले होते. नियोजना संदर्भात चर्चा झाली. असं देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार उद्याच्या सभेत बोलणार का? की राष्ट्रवादीकडून अन्य दोन नेते या सभेत बोलणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राऊतांचा भाजपवर घणाघात दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या दबावंन राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात