तुषार कोहळे, प्रतिनिधी
नागपूर, 20 मार्च : 'लॉकडाउन (Lockdown) हा पर्याय नाही, मात्र नागपूरमध्ये सात दिवस लॉकडाउन केला आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावला पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही' असं मत भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केलं आहे.
नागपुरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक बोलावली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातही बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार बैठकीला उपस्थित आहे.
गायत्री मंत्राच्या जपामुळे Covid-19 बरा होईल का? शास्त्रज्ञांनी सुरू केला अभ्यास
'नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या दोन तीन दिवसात मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहे. तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे', असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ग्लॅमरस अभिनेत्री शेतात चालवतेय नांगर; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
'विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे. त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आलात, यावर तोडगा या बैठकीत काढला जाईल, जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाउन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाउन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही असे देखील', फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संख्येवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला सोबत वॅक्सिनेशन वाढवण्याची गरज असल्याचे मागणी त्यांनी यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Covid-19, Devendra Fadnavis, Lockdown, Maharashtra, Nagpur, Rss bjp meeting