मुंबई 20 मार्च**:** रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दक्षिणेकडे धुमाकूळ घातल्यानंतर आता ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहणार आहे. ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Sidharth Malhotra) रोमान्स करताना दिसणार आहे. अभिनयासोबतच रश्मिका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. अलिकडेच तिनं शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रश्मिकानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात नांगर चालवताना दिसत आहे. रश्मिका हे काम मनापासून करताना दिसत आहे. तिचा लूकही संपूर्ण ग्रामीण महिलेसारखाच आहे. या व्हिडीओवर तिनं “गीत ऐका आणि व्हिडीओ पाहा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शूटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होते. मला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.” अशा आशयाची कॉमेंट लिहित आपला अनुभव शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटक्यांनी यावर प्रतिक्रिया देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवश्य पाहा - ‘तारक मेहता’च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट; आणखी एका कलाकाराला COVIDची लागण
अवश्य पाहा - …म्हणून अलका याग्निक आमिर खानवर संतापल्या; धक्का देऊन काढलं होतं स्टुडिओबाहेर रश्मिकानं 2016 साली क्रिक पार्टी या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर अंजनी पुत्र, चमक, चालो, गीता गोविंदम, देवदास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. दरम्यान पोगारु या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादात सापडला होता. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. रश्मिका आता लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करत आहे.