मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अशोक चव्हाणांनी भाजपला चारली धुळ, होमग्राऊंडमध्ये फडकावला महाविकास आघाडीचा झेंडा!

अशोक चव्हाणांनी भाजपला चारली धुळ, होमग्राऊंडमध्ये फडकावला महाविकास आघाडीचा झेंडा!

 या लढतीत काँग्रेसचे (Congress) मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (pratap patil chikhalikar) यांच्यात मुख्य चुरस होती.

या लढतीत काँग्रेसचे (Congress) मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (pratap patil chikhalikar) यांच्यात मुख्य चुरस होती.

या लढतीत काँग्रेसचे (Congress) मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (pratap patil chikhalikar) यांच्यात मुख्य चुरस होती.

 

नांदेड, 04 एप्रिल : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे (Nanded District Central Bank election) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण, या लढतीत काँग्रेसचे (Congress) मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (pratap patil chikhalikar) यांच्यात मुख्य चुरस होती. या निवडणुकीत 'मविआ'चा पॅटर्न यशस्वी ठरला. काँग्रेसच्या हाताला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बळ मिळालं आणि नांदेडच्या जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत 'मविआ'ला एकहाती सत्ता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत बँकेवर सत्ता मिळवली. या निवडणुकीतही 'मविआ'चा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

'...तर बांगलादेशात 25 वर्षात एकही हिंदू शिल्लक राहाणार नाही'

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झाली होती. राष्ट्रवादीचा एक गट एका गटाने भाजपला साथ देत जिल्हा बँक ताब्यात घेतली होती. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या वर्चस्वाला त्यावेळेस धक्का बसला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हानानी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मोट बांधत महाविकास आघाडी केली. अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकरांना शह देण्यात यशस्वी झाले आहेत. यात 21 पैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या तर एकूण 21 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने बळकावल्या. त्यात कोंग्रेसने 12, राष्ट्रवादीने 4 आणि शिवसेनेने एक जागा जिंकली. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

बार, हॉटेल बंद, पण...; राज्य सरकारकडून 'मिनी लॉकडाऊन' जाहीर

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील यांचा विजय झाला आहे. विजयानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले. तर हा धनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

First published:

Tags: Ashok chavan, Nanded