मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. रात्री 8 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बार आणि हॉटेल बंद (Bars and hotels closed) करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला होता. त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन
30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहे. त्यामुळे बार, हॉटेल, रेस्टारंट आणि मॉल्स बंद राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट आणि बार हे बंद जरी असले तरी होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल सेवांसाठी परवानगी आहे.
तसंच, नाट्यगृह, सिनेमागृह सुद्धा बंद राहणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाउन असणार आहे.
मोठी बातमी, लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल अजित पवारांचे मोठे विधान
मुंबईत लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
शासकीय कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहे. धार्मिक स्थळावर देखील काही बंधन घालण्यात आल आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.