मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'...तर बांगलादेशात 25 वर्षात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही'

'...तर बांगलादेशात 25 वर्षात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही'

सेंट फॉर डेमोक्रेसी प्लूरलिजम अँड ह्यूमन राइट्स अर्थात CDPHRच्या अहवालानुसार बांगलादेशात (Bangladesh) धार्मिक अल्पसंख्यांकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.पाकिस्तानाप्रमाणे (Pakistan) बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 4 एप्रिल: सेंट फॉर डेमोक्रेसी प्लूरलिजम अँड ह्यूमन राइट्स अर्थात CDPHRच्या अहवालानुसार बांगलादेशात (Bangladesh) धार्मिक अल्पसंख्यांकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाकिस्तानाप्रमाणे (Pakistan) बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौ-यानंतर बांगलादेशातील हिंदूंबाबत (Hindu) अनेक धक्कादायक रिपोर्ट समोर आलेत. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जातो. तेथील हिंदू धर्मीय कसंही करुन देश सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. जर बांगलादेशात अशीच परिस्थिती राहिली तर पुढील 25 वर्षात तिथे एकही हिंदू शिल्लक राहाणार नाही असा दावा CDPHRनं केलाय.

CDPHRनं भारत, पाकिस्तान बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि तिबेटमधील मानवाधिकाराबाबत एक रिपोर्ट तयार केलाय. विशेष म्हणजे हा रिपोर्ट उच्च शिक्षित, वकील, न्यायाधीश, पत्रकार तसंच संशोधकांच्या गटानं तयार केला आहे.या रिपोर्टनुसार हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ढाका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अब्दुल बरकत यांनी दिलेल्या अहवालात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या अहवालानुसार गेल्या चार दशकात बांगलादेशातून तब्बल  2.3 लाख नागरिकांनी पलायन केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर देश सोडण्याच्या तयारीत असणा-यांची संख्या कित्येक पटीनं जास्त आहे.

BREAKING : 'सहकार्य असू द्या', विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना पहिला फोन

पाकिस्तानातही अल्पसंख्यांकांच परिस्थिती चिंताजनक

CDPHRच्या अहवालानुसार भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात तर अल्पसंख्यांकांची अवस्था खूपच बिकट आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांबाबत अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानात हिंदूंसह शिख, ख्रिश्चन यांच्यातही भेदभाव केला जातो. या अल्पसंख्यांकांवर अनेक अत्याचार केले जातात. त्यांच्या मुलभूत अधिकारांवरही गदा आणली जाते. आजही इथल्या अल्पसंख्यांकांच्या स्त्रिया आणि मुली सुरक्षित नाहीत. त्यांना नेहमी दहशतीखाली जगावं लागतं. फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची संख्या 3.5 कोटी इतकी होती. आता ती घटून केवळ 50 ते 60 लाखांवर आली आहे.

First published:

Tags: Pakistan