#nanded

Showing of 1 - 14 from 156 results
Special Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'

व्हिडिओJan 19, 2019

Special Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'

नांदेड, 19 जानेवारी : नांदेड हा खरंतर अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला. पण, याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीची विराट सभा घेऊन अशोकरावांची झोप उडवली आहे. एवढंच नाहीतर तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला एक खुली ऑफर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, पण त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्याव्यात, अशी खुली ऑफर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडीसमोर ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी ओवैसींची ही खुली ऑफर स्वीकारणार का हे पहावं लागणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close