मुंबई, 6 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं. मात्र नवीन सरकार स्थापन झालं तरी अजून शिवसेना कुणाची हा प्रश्न कायम आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे गट’ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले. याबाबत त्यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. यात कोणत्या पक्षाला किती यश मिळालं याची आकडेवारी त्यांनी दिली. यात त्यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे. ‘उद्धव ठाकरेंसोबत असताना शिंदे शिस्तीत वागायचे, पण आता..’, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला एकनाथ शिंदे यांचं ट्वीट एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हटलं की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार... pic.twitter.com/2Y72CAFuSy
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता. आपल्या शुभेच्छामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला होता. ‘भाजपसोबत गेले म्हणून वाचले’; वर्षा राऊतांच्या ईडी चौकशीदरम्यान सुनील राऊतांचा शिवसेना नेत्यांवरच गंभीर आरोप सुप्रीम कोर्टात 8 ऑगस्ट रोजी सुनावणी शिवसेना कुणाची हा राजकीय पेच सोडवण्यासाठी प्रकरणाची पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल, मनु सिंघवी यांनी बाजू मांडली.