मुंबई, 6 ऑगस्ट: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे, तसेच त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी होणार आहे. त्यांच्या बँक खात्यातून काही व्यवहार झाले असल्याने त्यांची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. प्रविण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या खात्याचे तपशील, जमीन व्यवहार याबाबत आज त्यांची चौकशी होऊ शकते. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? विरोधी पक्षनेतेपदावरुन जयंत पाटील नाराज सुनील राऊत यांचे गंभीर आरोप वर्षा राऊत चौकशीसाठी हजर होण्याआधी आमदार सुनील राऊत यांनी म्हटलं की, सर्व व्यवहार नियमाप्रमाणे झाले आहेत. अलिबाग येथील जमीन रेडी रेकनर पेक्षा जास्त दराने खरेदी केली आहे. 2013 ला खरेदी जमिनीवर आज जाग आली का? असा सवालही सुनील राऊत यांनी विचारला आहे. जे काही सुरु आहे ते भाजपचे षडयंत्र आहे. कोणत्याही व्यवहारात काळेबेरे नाही. वर्षा राऊत यांच्या हाताला 2 महिन्यांपासून दुखापत आहे. फडणवीसांसोबतच्या भेटीनंतरही स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस; भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम? पत्राचाळ प्रकरणात 9 कॉन्ट्रॅक्टर्सची चौकशी करा. मोहित कंबोज यातील एक कॉन्ट्रॅक्टर आहे. भाजपमध्ये गेले की पावन होतात. शिवसेनेचे प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांचा कोट्यवधींचा घोटाळा केला. मात्र भाजपात गेले म्हणून वाचले. संजय राऊत भाजपात गेले असते तर हे बंद झालं असतं. संजय राऊत खरा प्रामाणिक माणूस असून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावाही सुनील राऊत यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.