पुणे 06 ऑगस्ट : विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार करा अशी विनंती आम्ही अनेक दिवसांपासून करत आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी फक्त लवकर करु लवकर करु असं म्हणणं बंद करावं, असा सल्ला पवारांनी दिला.
'भाजपसोबत गेले म्हणून वाचले'; वर्षा राऊतांच्या ईडी चौकशीदरम्यान सुनील राऊतांचा शिवसेना नेत्यांवरच गंभीर आरोप
यासोबतच कायद्याचं पालन करा, असंही त्यांनी शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री रुग्णालयात असताना रात्री 12-1 वाजेपर्यंत घोषणाबाजी केली जाते. मुख्यमंत्र्यांना माईक बंद करायचं कळत नाही? असा सवालही त्यांनी केला. पुढे अजित पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे सोबत असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे. मात्र, आता वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
पुढे मंत्रिमंडळ विस्तारावरुन टोला लगावताना ते म्हणाले, की सचिवांना अधिकार द्यायचे तर चीफ सेक्रेटरींनाच अधिकार देऊन टाका ना. लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार दिलेले नाहीत. मंत्रिपदं दिली नाहीत. दिल्लीवारी केल्याशिवाय आणि तिथून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येत नाही हे स्पष्ट आहे. मध्ये कानावर आलं की राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार. आता ऐकायला मिळतंय की कोर्टाच्या निर्णयासाठी थांबले आहेत.
फडणवीसांसोबतच्या भेटीनंतरही स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस; भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?
कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना अजित पवार म्हणाले, की सत्ता येते आणि जाते. कुणी ताम्रपट घेऊन येत नाही. उद्या जर कोर्टाचा निकाल आला तर, हे सरकार ही जाऊ शकतं. मनपा निवडणूक कधी होईल याबद्दलही काहीही सांगता येत नाही. त्यामुळे तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.