जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? भास्कर जाधवांसह या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? भास्कर जाधवांसह या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

uddhav news

uddhav news

नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तडीपार मोर्चानंतर NRI आणि सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी मुंबई 20 ऑक्टोबर : शिवसेनेचा तडीपार मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाने पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. याप्रकरणी आता यात उपस्थित असलेल्या नेत्यांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तडीपार मोर्चानंतर NRI आणि सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.कारण आधीच त्यांच्यावर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. अशात आता भास्कर जाधव आणि इतरांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, हायकोर्टात याचिका करणाऱ्या गौरी भिडे कोण आहेत? चिथावणीखोर वक्तव्य, अब्रू नुकसान, शांतता भंग, आदेशाची पायमल्ली, हेतू पुरस्कर इजा, बेकायदेशीर समूह जमवणे, त्याचा भाग असणे, मनुष्याला क्रोध येईल, अपमान वाटेल असे वक्तव्य करणे, यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांवर गुन्हा दाखल - मोर्चात अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राउत, अंबादास दानवे, राजन विचारे, केदार दिघे, मनोहर भोईर, बबन पाटील, चंद्रकांत डोलारे, भारत पाटील, अनिता बिर्जे, सुनिल प्रभु, नरेश रहाळकर, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरेंवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, हायकोर्टात याचिका, आदित्य म्हणतात, प्रॉपर्टी बघायची असेल तर… या मोर्चावेळी विनायक राऊत यांनी डीसीपींना इशारा दिला होता. 100 केस घेतलेला मुख्यमंत्री बनतो, आणि एकही केस नसलेला तडीपार होतो. मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही कायदा कळतो असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी डीसीपींना दिला होता. खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसैनिकांना पोलीस संरक्षणाची गरज नाही, आम्ही रजनी पटेल यांना घाबरलो नाही आता मितेशला काय घाबरणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात