जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरेंवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, हायकोर्टात याचिका, आदित्य म्हणतात, प्रॉपर्टी बघायची असेल तर...

ठाकरेंवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, हायकोर्टात याचिका, आदित्य म्हणतात, प्रॉपर्टी बघायची असेल तर...

ठाकरेंवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, हायकोर्टात याचिका, आदित्य म्हणतात, प्रॉपर्टी बघायची असेल तर...

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राजमुद्रा प्रिटींग प्रेसच्या संचालिका गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय आहेत? हा प्रश्न त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला. यासोबतच कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा काय झाला? हा प्रश्नही याचिकेत विचारण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता, ज्यात झालेल्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल विचारताना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंची बेहिशोबी मालमत्ता आहे का? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया दरम्यान या याचिकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची संपत्ती पाहायची होती, तर दसरा मेळाव्यात दिसली असती. लोकांचं प्रेम आहे तीच आमची संपत्ती आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कोर्टात काय झालं? उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. याचिकाकर्त्या गौरी भिडे या स्वत: युक्तीवाद करत असल्याने कोर्ट कार्यालयाने काही आक्षेप घेतले. त्यामुळे याचिकाकर्त्यांना आधी सगळे आक्षेप दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेवरच संकट टळलं, दिल्ली कोर्टाचा मोठा दिलासा, मशाल धगधगतीच राहणार! गौरी भिडे काय म्हणाल्या? ‘2019 पासून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पब्लिक डोमेनवर काही गोष्टी आढळल्या, त्यावरून मी याचिका केली. मी अनेक वकिलांची भेट घेतली, पण कुणी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी स्वत:च याचिकेवर युक्तीवाद करणार आहे. मी 11 जुलैला तक्रार केली आणि 26 जुलैला रिमायंडर तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी काहीही न केल्यामुळे मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली,’ असं गौरी भिडे म्हणाल्या. गौरी भिडे यांना ठाकरेच का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, इतरही असतील पण आता सुरूवात झाली आहे, अन्य जणही पुढे येतील. माझ्या तक्रारीवर तपास व्हावा ही इच्छा आहे. पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होईल, असं गौरी भिडे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात