मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Andheri By Election : ऋतुजा लटकेंच्या डोक्यात काय शिजतंय? BMC राजीनामा प्रकरणात धक्कादायक खुलासे

Andheri By Election : ऋतुजा लटकेंच्या डोक्यात काय शिजतंय? BMC राजीनामा प्रकरणात धक्कादायक खुलासे

फाईल फोटो

फाईल फोटो

समोर आलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांच्या BMC राजीनामा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला तर अजून तो मंजूर का झाला नाही? या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 12 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नसल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे.

Andheri By Election: ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट

पोटनिवडणुकीतील प्रस्तावित उमेदवार ऋतुजा लटके या महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा अद्याप BMC प्रशासनानं स्वीकारलेला नाही. जर राजीनामा स्वीकारला नाही तर त्या अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज भरू शकणार नाहीत, अशी बातमी समोर आली होती. मात्र, ऋतुजा लटके यांनी राजीनाम्याच्या अर्जात ठेवलेल्या अटीमुळे हा राजीनामा स्विकारला गेला नसल्याचं समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांच्या BMC राजीनामा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला तर अजून तो मंजूर का झाला नाही? या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. ऋतुजा लटके यांनी हा राजीनामा कंडिशनल दिल्याची माहिती आली समोर आली आहे. जर विधानसभा निवडणूक पराजित झाले तर पुन्हा BMC सेवेत घ्या, असा मजकूर राजीनामा पत्रात आहे.

'वेळ आली की फडणवीस तलवार-ढाल पकडतील आणि मुख्यमंत्री...', नव्या चिन्हावरुन चंद्रकांत खैरेंचा टोला

हा असा मजकूर म्हणजे मोठी तांत्रिक अडचण आहे. राजीनामा म्हणजे कॅव्हेट नव्हे. कोणताही राजीनामा हा कंडिशनल असू शकत नाही, असा सल्ला BMC प्रशासनाला कायदातज्ञांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता ऋतुजा लटके यांनी सुधारित ऍप्लिकेशन केल्याचं सांगितलं जात आहे. यात कोणतीही कंडिशन नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र या राजीनामा पत्राला पूर्व सादर राजीनामा सुधार पत्र समजायचं का नवं ऍप्लिकेशन ? हा निर्णय BMC प्रशासनाच्या हाती आहे. कारण पूर्व दिनांक ग्राह्य धरला तरच नियमात नोटीस कालावधी पूर्ण होत आहे. ऋतुजा लटके या शिवसेनेतील कोणत्या पक्षाच्या उमेदवारीसाठी तयार आहे, यावर हा निर्णय अवलंबून असल्याची माहिती समोर येत आहे.

First published:

Tags: Andheri, BMC, Election, Uddhav Thackeray