पुणे 12 ऑक्टोबर : शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळं नाव आणि चिन्ह दिलं आहे. आता यावरुनही दोन्ही गटांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या चिन्हावरुन त्यांना खोचक टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, की मशाल ही मार्ग दाखवणारी आहे. आमच्या पक्षाला निश्चितच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. निवडणूक आयोगाने चिन्ह जाहीर केल्याबरोबर अवघ्या पाच मिनिटात मशाल घरोघर पोहोचली, असा दावा त्यांनी केला. शिंदे गटावर टीका करत ते म्हणाले की ‘त्यांच्या चिन्हात दोन तलवारी आहेत, एक मुख्यमंत्र्यांकडे राहील आणि दुसरी उपमुख्यमंत्र्यांकडे राहील. जर पुढे काही झालं तर एकनाथ शिंदे लढाई करतील आणि फडणवीस तलवार आणि ढाल पकडतील.’ ‘आम्ही तुमचा नाही, तर तुम्हीच आमचा बाप चोरला कारण..’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा खैरे पुढे म्हणाले, की तुम्ही कशा करता शिवसेना फोडली, हे आता जनतेला पूर्णपणे कळून आलं आहे. नेमकी कुणी गद्दारी केली, हे सगळ्यांना कळालं आहे. शिवसेना फोडून तुम्ही बाळासाहेबांना दुःखच दिलं. शिवसेना ही संपूर्ण देशात होती, मात्र तुम्ही संघटना मोडली, अशी टीका करत अंधेरी पोट निवडणुकीची लढाई आम्हीच जिंकू असा दावा त्यांनी यावेळी केला. तलवारी किंवा कुठलं हत्यार निशाणी नसते मग आता ढाल तलवार नेमकी कशी दिली? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक आयोगाला केला. सगळ्या संस्था केंद्राच्या हातात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. Shivsena Symbol : ‘धनुष्यबाण’ गोठल्यानंतर उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना फोन, पुढचं प्लानिंगही ठरलं! नारायण राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की नारायण राणे तर उद्धव साहेबांना एकेरी भाषेत बोलतात. केंद्रात मंत्री असताना अशी भाषा त्यांनी वापरावी का? नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते काहीही बडबड करतातशिवसेनेमुळेच तुम्ही शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला होतात, असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना ते म्हणाले, की बाळासाहेबांचा विचार म्हणजे उद्धव आणि आदित्य यांना सांभाळायचा होता. पण तुम्ही तो कुठे ऐकला?बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. आता शिवसेना शिंदेंची राहिलीच नाही आता ओरिजनल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. या सगळ्यात भाजपने राजकारण साधलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.