मुंबई, 24 जून : मागच्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडखोरीला काही अंशी यश येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शिंदे गटाकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal) यांना याबाबत त्यांनी पत्र पाठवलं आहे. तसेच शिवसेनेकडून (shiv sena) 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहे. या सगळ्यावर संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना नारायण राणे (narayan rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर आमदारांचे संख्याबळ कागदावर दिसत असले तरी मुंबईत आल्यावर वेगळी दिशा असेल हे लक्षात घ्या असे ते म्हणाले.
यावर संजय राऊत म्हणाले की, आता ही कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार आहेत शिवसेनेचा आकडा कमी झाला आहे. परंतु ते त्यांचे बहुमत कागदावर असले तरी त्यांचे मुबईत आगमन झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करणारे कित्येक आमदार शिवसेनेसोबत असतील असे राऊत म्हणाले. लोकशाहीमध्ये बहुमत हा खेळ आकड्यांचा असतो. जे आमदार बंडात गेले आहेत ते मुंबईत आल्यावर त्यांच्या निष्ठेची खरी कसोठी असल्याचेही राऊत म्हणाले.
हे ही वाचा : Eknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल
कित्येक आमदार विधानसभेत आल्यानंतर शिवसेनेच्या फेवरमध्ये त्यांना मतदान करतील हे तुम्हाला येणारा काळच दाखवून देईल. संख्याबळ हे कागदावर वाढू शकतं पण मुंबईत आल्यावर जे काय आहे ते दिसेल. 12 आमदारांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे त्यावर मी काही जास्त बोलणार नाही. याबाबत जी प्रक्रीया सुरू आहे ती पुढच्या काही काळात दिसेल असेही राऊत म्हणाले.
नारायण राणेंची भाषा भाजपची आहे का?
शरद पवार यांच्यावर जे वक्तव्य करत आहेत ती भाषा भाजपची आहे का? शरद पवार हे देशाचे नेते आहेत त्यांचा आदर मोदीजी करतात. ते आम्हाला काहीही बोलूदेत त्यांना आम्ही उत्तर देऊ पण पवार हे जेष्ठ्य नेते आहेत. त्यांना बोलणे कितपत योग्य हे त्या नेत्याला समजत नसेल तर ही भाषा भाजपची आहे का? असा सवालही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
हे ही वाचा : 'महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..', एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं
खासदार अरविंद सावंत काय म्हणाले
एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे अरवींद सांवत यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असुन सुद्धा न आल्याचं कारण देत शिवसेनेकडून 12 आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Mla, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)