नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यांनी संजय राऊत यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणतात माझा चेहरा नव्हता मी शिवसेनेच्या चेहऱ्यामुळे निवडून आलो. मात्र मी संजय राऊत यांना सांगतो चेहरा महत्त्वाचा नसतो तर त्या माणसाचं काम महत्त्वाचं असतं. राऊत यांनी कधी साधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक तरी घेतली आहे का? असा घणाघात खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले गोडसे?
हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणतात माझ्यामागे निवडून आलो तेव्हा शिवसेनेचा चेहरा होता. मात्र चेहरा महत्त्वाचा नसतो तर काम महत्त्वाचं असतं. राऊत यांनी साधी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची तरी बैठक घेतली आहे का? असा सवाल गोडसे यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी संपूर्ण शिवसेनेचं वाटोळं केलं. या माणसामुळे शिवसेनेची वाट लागली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचं काम राऊत करत आहेत. संजय राऊत यांच्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलीन झाली असा गंभीर आरोप गोडसे यांनी केला आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल? मनोहर जोशींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत यांना आव्हान
दरम्यान यावेळी हेमंत गोडसे यांनी थेट संजय राऊत यांनाच आव्हान दिलं आहे. हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी नाशिकमधून निवडणूक लढवून दाखवावी . हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान त्यांनी राऊत यांना दिलं आहे.
हेही वाचा : राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितली तारीख अन् महिना
काय म्हणाले होते राऊत
संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना खासदार हेमंत गोडसे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शिवसेनेच्या चेहऱ्यामुळे हेमंत गोडसे हे निवडून आले होते. मात्र त्यांनी आता पुन्हा निवडून येऊन दाखवावे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray