मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल? मनोहर जोशींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल? मनोहर जोशींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे, मनोहर जोशी

उद्धव ठाकरे, मनोहर जोशी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते मनोहर जोशी यांची आज भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे आज मनोहर जोशी यांची भेट घेणार असल्यानं संपूर्ण राजकीय वर्तृळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या भेटीबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटामध्ये सुरू असलेली गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सदिच्छा भेट की पडझड रोखण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरे हे आज मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत.  या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तृळाचं लक्ष लागलं आहे.  या भेटीबाबत वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटामध्ये गळती सुरू आहे. अनेक दिग्गज नेते शिंदे गटात सामील होत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॅमेज कट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मनोहर जोशी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ही सदिच्छ भेट असावी असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:  राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितली तारीख अन् महिना

'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत'  

दरम्यान आपण कोणासोबत आहोत ठाकरे गट की शिंदे गट यावर बोलताना मनोहर जोशी यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  मी आधीपासूनच शिवसेनेत होतो. त्यामुळे मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल असं मनोहर जोशी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत.

First published:

Tags: Shiv sena, Uddhav Thackeray