मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितली तारीख अन् महिना

राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितली तारीख अन् महिना

एकनाथ शिंदे, सुषमा अंधारे

एकनाथ शिंदे, सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Ajay Deshpande

भंडारा : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील टोला लगावला. त्या भंडाऱ्यात बोलत होत्या. राज्यातील  शिंदे,फडणीस सरकार जानेवारी महिन्यात कोसळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  भोंडेकर हे विदर्भातील माझे सर्वात लाडके भाऊ आहेत. त्यांना नक्कीच भेटणार असून, नरूभाऊ येणारी निवडणूक जिंकणार नाहीत. भंडारा येथून मी निवडणूक लढवण्यापेक्षा या जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारीच भोंडेकरांसाठी त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

नीती आयोगावरू निशाणा

दरम्यान यावेळी अंधारे यांनी नीती आयोगावरून देखील सरकारला टोला लगावला आहे.  महारष्ट्र तोडण्याची भाषा करण्यापेक्षा राज्य सरकारने राज्य जोडण्याची भाषा करावी. विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. नीती आयोगाला सल्ला देण्यासाठी मित्र नावाची संस्था तयार केली. मुख्यमंत्री यांचे मित्र अजय अशर यांना मुख्य कार्यकारी पदावर बसविले. अशर यांना बांधकाम विभागाचा अनुभव असताना त्यांना नीती आयोगाची जबाबदारी देण्यात आली. यावरून राज्य सरकारची जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी भूमिका दिसून येते. या माध्यमातून विदर्भ वेगळा करण्याची देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा आरोप आंधरे यांनी केला आहे.

हेही वाचा:  Sanjay Raut and Udayanraje : ‘पैगंबरांविषयी बोललेल्या नुपूर शर्मावर कारवाई मग’…, उदयराजेंची पाठराखण करत राऊतांचा भाजपला सवाल

'निवडणुकीत बाळासाहेबांचे फोटो'  

मोदींचा करिष्मा त्यांच्या गुजरातमधून ओ'सरला आहे. भाजपाने रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला गुजरातमधून तिकीट दिले आहे.  मात्र गुजरातमध्ये मोदींचा करिष्मा ओसरल्यानं जडेजा यांना बाळासाहेबांच्या जुन्या व्हिडिओचा सहारा घ्यावा लागला असून, तो व्हिडीओ व्हायरल करून मत मागण्याचा प्रसंग भाजपवर ओढवल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा :  जन्म झाला अन् 'ती'ला शौचालयाच्या बादलीत टाकलं; भयंकर घटनेनं बीड पुन्हा हादरलं

राजू पाटलांवर निशाणा  

यावेळी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी  मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेताना आहे. भेकड लोकांवर मी काय बोलणार, ते माझ्या पाठीमागून बोलतात. मी तर, सर्वांसमोर उत्तर देते, असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray