PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींना सवाल

PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींना सवाल

देशातील लॉकडाऊन संपलेला नसून लॉकडाऊन 4.0 चेही मोदींनी यावेळी संकेत दिले.

  • Share this:

मुंबई, 13 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काल (मंगळवारी) देशातील जनतेला उद्देशून भाषण केलं. देशातील लॉकडाऊन संपलेला नसून लॉकडाऊन 4.0 चेही मोदींनी यावेळी संकेत दिले. सोबतच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) खोचक टीका केली आहे.

'20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे PMCare फंडासाठी एव्हढी जाहिरात का करत आहेत?,' असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा..  बाजार करण्यासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, भरधाव ट्रकनं चिरडलं

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशात लॉकडाऊन वाढवण्यासाठी जनतेला संबोधित केलं. 20 कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेजही जाहीर केलं. पण हा उद्देश साध्य करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागतील, हे स्पष्ट केलं. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मास्क लावूनच काम करा. 18 तारखेनंतर चौथा लॉकडाऊन सुरू होईल. पण त्याचे नियम वेगळे असतील. त्याची माहिती 17 तारखेपर्यंत सविस्तरपणे सांगितली जाईल, असं ते म्हणाले.

लॉकडाऊन 4.0 मध्ये होणार असे बदल

लॉकडाऊन 3 मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन 4.0 मध्ये असणार आहे. यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच्या एका बैठकीत दिले होते.

हेही वाचा...या हॉटस्पॉटमधून दिलासादायक वृत्त! 213 रुग्णांना हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज

रेड झोनमध्येही देणार सूट

मोदींच्या या प्लॅननुसार रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची शक्यता आहे.

First published: May 13, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading