उस्मानाबाद, 13 मे: ग्रीनझोनमध्ये आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात बाजार उघडण्यास सूट देण्यात आली आहे. पण, बाजार करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. कळंब शहरात बाजार करण्यासाठी आलेल्या तरुणाला भरधाव ट्रकनं चिरडल्याची घटना घडली आहे. कळंब शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात हा तरुण रास्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकनं (एमएच 11 एए 8590) त्याला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोकांना हा अपघात झाल्याचं लक्षात येताच त्यांना आरडाओरड केली. पण तोपर्यंत ट्रकचालक हा पुढे निघून गेला होता. लोकांनी ट्रक अडवला. मात्र, चालक पळून जाण्यास यशस्वी झाला. नागरिकांनी क्लिनरला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. मृत तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. हेही वाचा.. भाजप नेत्याची लॉकडाऊनमध्ये पोलिस आणि वाळू तस्करांसोबत रंगली ओली पार्टी! दुसरीकडे, परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे 3 ट्रक आणि 1 कारचा दोन दिवसांपूर्वी भीषण विचित्र अपघात झाला होता. चांदवडच्या राहुड घाटात हा अपघात झाला होता. या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात कार मधील तिघांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सध्या परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने स्थलांतरीत होत आहे. मिळेल त्या वाहनातून ते आपल्या गावाकडे जात आहे. काही मजुरांनी तर पायी चालत जाण पसंत केलं आहे. असेच काही मजूर हे 3 ट्रकमधून उत्तर प्रदेशकडे जात असताना चांदवडच्या राहुड घाटात समोरून येणारी कार आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. मागून येणारे 2 ट्रक पुढील ट्रकवर येऊन आदळले. अपघातग्रस्त वाहनातून जखमींना काढून त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा.. या हॉटस्पॉटमधून दिलासादायक वृत्त! 213 रुग्णांना हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनमुळे शहरं ओस पडली असून गावगाडाही ठप्प झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूनक ठप्प आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या गावाकडे निघाले आहेत. जीवाची पर्वा न करता मजूर मिळेल त्या वाहनाने गावी निघाले आहे. तर काही मजुरांनी पायी प्रवास सुरु केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.