या हॉटस्पॉटमधून दिलासादायक वृत्त! 213 रुग्णांना हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज

या हॉटस्पॉटमधून दिलासादायक वृत्त! 213 रुग्णांना हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज

मालेगाव शहरात झपाट्याने वाढणारा बाधित रुग्णांचा आकडा नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे वेगाने कमी होत आहे.

  • Share this:

मालेगाव, 13 मे: कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात झपाट्याने वाढणारा बाधित रुग्णांचा आकडा नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे वेगाने कमी होत आहे. पॉझिटिव्ह असूनही 10 दिवसांत कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या 213 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात मालेगाव शहरातील 205 व दाभाडीच्या 8 रुग्णांचा समावेश आहे. पुढील सात दिवस हे रुग्ण होम आयसोलेशन राहतील. आता रोज अशा प्रकारच्या रुग्णांना घरी सोडले जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा... मुंबईत 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनाला हरवलं, डॉक्टरांनीही केलं कौतुक

हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात आत्तापर्यंत 560 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासन व नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, शासनाच्या नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे बाधित रुग्णांच्या घटणाऱ्या संख्येने काहीसा दिलासा मिळला आहे. बाधित आढळलेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही. तरीही अशा रुग्णांवर उपचार करून दहा दिवस देखरेखीखाली ठेवले जात आहे.

हेही वाचा..भाजप नेत्याची लॉकडाऊनमध्ये पोलिस आणि वाळू तस्करांसोबत रंगली ओली पार्टी!

या 10 दिवसांत ताप, खोकला,सर्दी आदी लक्षणे नसल्यास या रुग्णांना घरी सोडले जात आहे. ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यात मन्सूरा हॉस्पिटल 24, फरानी हॉस्पिटल 17 व म्हाडा कॉलनी कोविड सेंटरच्या 21 रुग्णांना समावेश आहे. घरी सोडलेल्या रुग्णांना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. या काळात ते घराबाहेर पडणार नाही यासंदर्भात त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले आहे.

दुसरीकडे, येवल्यातील 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात 12 आणि 16 दिवसांच्या बालकांचा समावेश आहे. कोरोनावर मात करून आलेल्या या रुग्णांचे जोरदार स्वागत करण्यात आले. 26 एप्रिलला एकाच कुटुंबातील हे पाच जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र कोरोनाचा पराभव करून पाचही जण घरी सुखरूप परतले आहेत.

First published: May 13, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या