जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास...; राणेंची थेट शरद पवारांनाच धमकी

आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास...; राणेंची थेट शरद पवारांनाच धमकी

आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास...; राणेंची थेट शरद पवारांनाच धमकी

भाजप नेते नारायण राणे हे शिवसेनेच्या आमदारांची पाठराखण करताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली. त्यातून शरद पवारांनी सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. या सर्व घटनेनंतर नारायण राणे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि शेवटी स्वत:च पवारांना धमकी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.

जाहिरात

राज्यातील राजकीय अपडेट राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. दादा भुसे गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड, आमदार रविंद्र फाटक, किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा झटका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात