मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'या' 10 राज्यांनी वाढवली सरकारची चिंता, असा आहे महाराष्ट्रातील रुग्णांचा ग्राफ

'या' 10 राज्यांनी वाढवली सरकारची चिंता, असा आहे महाराष्ट्रातील रुग्णांचा ग्राफ

एकूण देशातील 90% रुग्ण हे या 10 राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 3722 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण देशातील 90% रुग्ण हे या 10 राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 3722 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण देशातील 90% रुग्ण हे या 10 राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 3722 रुग्णांची नोंद झाली आहे.

    नवी दिल्ली, 14 मे : कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या 78 हजारवरून जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 3722 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळं मृतांचा आकडा आता 2549 वर पोहचला आहे. आतापर्यंत 26 हजारहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र या 10 राज्यांत कोरोनाचे 90% रुग्ण आहेत. या 10 राज्यांनी वाढवली देशाची चिंता ज्या 10 राज्यांमध्ये-महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, बिहार, पंजाब आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1495 रुग्णांची नोंद झाली आहे. तमिळनाडूमध्ये 509 रुग्ण सापडले आहेत. गुजरातमध्ये 364 तर दिल्लीत 359 रुग्ण सापडले आहे. वाचा-भारत करणार कोरोनावर मात! 1500 रुग्णांवर WHO करणार 'या' 3 औषधांचं ट्रायल बिहारनं वाढवली चिंता काही राज्यांमध्ये सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बिहार, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरमधील रुग्णांची संख्या आता हजारांच्या घरात गेली आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासांत 109 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं आता एकूण मजूरांची संख्या 940 झाली आहे. बिहारमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त रुग्ण हे मजूर आहेत, जे इतर राज्यांतून परतले आहेत. हरियाणा आणि ओडिशामध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. एकट्या चंदीगढमध्ये 189 रुग्ण आहेत. गोवामध्ये 35 दिवसांनी सापडला कोरोनाचा रुग्ण गेल्या 35 दिवसांमध्ये गोवा राज्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता. मात्र बुधवारी राज्यात कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले. यातील 5 एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून गोवा पोहचले होते. त्यामुळं कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं शिरकाव केला आहे. वाचा-भारतात कोरोनाची स्थिती कशी राहणार? या संस्थेने वर्तवला सरकारची झोप उडवणारा अंदाज लॉकडाऊनमुळे भारतातील स्थिती भयंकर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत देशातील रोजगार आघाडीवरील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की दोन तृतियांश पेक्षा अधिक लोंकांनी आपले उपजीविकेचे साधन गमावले आहेत, तर जे लोक नोकरी सोडून गेले आहेत, त्यांचे उत्पन्न कमालीचे खाली आले आहे. परिस्थिती एवढी वाईट झाली आहे की निम्यापेक्षा अधिक घरात एकूण उत्पन्नातून आठवड्याभरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणेदेखील अवघड झाले आहे. वाचा-येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, 'हा' आजार ठरणार कारण
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या