मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉकडाऊनमध्ये कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ; चक्क पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच झाला विवाह सोहळा

लॉकडाऊनमध्ये कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ; चक्क पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच झाला विवाह सोहळा

लॉकडाऊनमध्ये विवाह सोहळे रद्द होत असताना एका नव्या प्रकारच्या सोहळ्याची वाट बीडच्या या जोडप्याने दाखवली. आपल्या जिवाची बाजी लावत जनतेचा जीव वाचवणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या साक्षीनेच लग्न केलं.

बीड, 13 मे : सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांना रट्टे मारणाऱ्या पोलिसांना आपण पाहात असतो. पण लॉकडाऊनमध्ये विवाह करण्यात अडचणी होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या पुढाकारातून सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून एक अनोखा विवाह सोहळा रंगला... तोही थेट पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफिसात आणि देवा-ब्राह्मणाऐवजी साक्षीला होते कोरोना योद्धे.

संपूर्ण बीडमध्ये या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सुरू आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातच हा विवाह सोहळा पार पडला.

बीड शहरातील उच्चशिक्षित वर प्रताप दातार आणि वधू प्रतीक्षा कोल्हे या तरुण जोडप्याने कोरोना वॉरिअर्सला साक्षी ठेवून विवाह करण्याचा मनोदय बोलून दाखवला. पोलिस दलाच्या अथक परिश्रमातून बीड जिल्हा कोरोनामुक्त राहिला. त्यासाठी पोलिसांचं ऋण मोठं आहे. त्याचं भान ठेवत या जोडप्याने पोलिसांना आपला मनोदय सांगितला. बीडचे एस.पी. हर्ष पोतदार यांनी परवानगी दिली आणि अवघ्या 10 मिनिटात सोशल डिस्टन्सिंग पाळून पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्यासमोरच प्रताप आणि प्रतीक्षाने आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची प्रतिज्ञा घेतली.

या अनोख्या लग्नसोहळ्याला वधूची आई, वराचा भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते असं मोजकं वऱ्हाड उपस्थित होतं. या नवविवाहितांनी पोलीस वेल्फेअर फंडासाठी 11 हजाराची मदत दिली.

आता केस कापायलाही व्हावं लागेल असं तैय्यार; हेअर कटिंग सलोनचं गुजरात मॉडेल ठरतंय हिट

"संकटाच्या कालावधीत तुम्ही आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेत आहात. सुजाण नागरिक म्हणून तुम्ही आनंदाने आयुष्य जगा. कोरोना संदर्भात जनजागृती करा. एक आदर्श म्हणून जगा," अशा शुभेच्छा हर्ष पोतदार यांनी देत पुस्तक भेट दिलं. पोलीस दलातल्या 2000 पोलिसांच्या शुभेच्छा तुमच्या विवाहास आहेत, असंही सांगितलं.

लग्न सोहळे करताना खर्च कमी करा, शासनाने दिलेले नियम पाळा, कोरोना संकटात एकत्रित खबरदारी घेऊन लग्न सोहळे आनंदात साजरे करा असा संदेश या निमित्ताने पोलिसांनी दिला आहे.

गावी जाण्यासाठी ई पास हवाय का? पोलिसांनी सांगितलेल्या अटी वाचा

First published:

Tags: Corona