श्रमिक ट्रेनमध्ये सापडले 3 कोरोना संशयित, बुधवारीही 4 प्रवाशांना केलं होतं आयसोलेट

श्रमिक ट्रेनमध्ये सापडले 3 कोरोना संशयित, बुधवारीही 4 प्रवाशांना केलं होतं आयसोलेट

गेल्या दीड महिन्यांपासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

  • Share this:

हरिद्वार, 14 मे : राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था केली आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध भागांमधून उत्तराखंडमधील निवासी परतत आहे. त्याचबरोबर येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज तिसरी ट्रेन अन्य प्रदेशांमधून उत्तराखंडात राहणाऱ्या नागरिकांना घेऊन हरिद्वारमध्ये पोहोचली.

बंगळुरुहून हरिद्वारला पोहोचलेल्या या ट्रेनमध्ये कोरोना व्हायरसचे 3 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी ट्रेन हरिद्वारला पोहोचल्यानंतर केलेल्या थर्मल स्क्रीनिंगमध्ये तिघांना चांगलाच ताप होता. या तिघांना आयसोलेशनमध्ये भरती करण्यात आलं आहे. या तिघांसह आतापर्यंत ट्रेनमधून आलेल्या संशयित प्रवासांची संख्या 7 झाली आहे.

ताळ्या वाजवून केलं स्वागत

सकाळी उत्तराखंडचे प्रवाशांनी भरलेली तिसरी श्रमिक एक्सप्रेस ट्रेन हरिद्वारला पोहोचली. जेथे ड्यूटीवर तैनात कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रवाशांचे स्वागत केले. या ट्रेनमध्ये 1341 कामगार प्रवास करीत होते. जे कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करीत होते. रेल्वे स्टेशनवर नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक कामगार टिहरी जनपदचे आहेत. रेल्वे स्टेशन पोहोचल्यानंतर या प्रवाशांनी मुख्यमंत्री आणि उत्तराखंडच्या प्रदेश सरकारच्या समर्थनार्थ नारे दिले. उत्तराखंड सरकारने येथेच रोजगार उपलब्ध करुन दिला तर दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची गरज लागणार नसल्याची भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केली.

गेल्या दीड महिन्यांपासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना काही दिवसांपासून ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. यासाठी योग्य व्यवस्था केली असली तरी येथे कोरोना संशयित रुग्ण सापडत आहे. यामुळे त्या राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर येत आहे.

संबंधित -धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा मृत्यू

लघुशंका करून येतो म्हणून गेला आणि जंगलात पळाला,पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून तरुण गायब

 

First published: May 14, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading