मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मल्लिकार्जुन खर्गे, ज्यांच्यामुळे झाला फडणवीस-पवारांचा शपथविधी, नेहरू सेंटरमधली Inside Story

मल्लिकार्जुन खर्गे, ज्यांच्यामुळे झाला फडणवीस-पवारांचा शपथविधी, नेहरू सेंटरमधली Inside Story

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, पण 3 वर्षांपूर्वी याच खर्गेंमुळे महाराष्ट्रात फडणवीस-पवारांचं सरकार आल्याचा दावा केला गेला.

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, पण 3 वर्षांपूर्वी याच खर्गेंमुळे महाराष्ट्रात फडणवीस-पवारांचं सरकार आल्याचा दावा केला गेला.

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, पण 3 वर्षांपूर्वी याच खर्गेंमुळे महाराष्ट्रात फडणवीस-पवारांचं सरकार आल्याचा दावा केला गेला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 ऑक्टोबर : मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली. अध्यक्ष झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर काँग्रेस संघटना मजबूत करण्याचं तसंच घटकपक्षांना एकत्र करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान असेल.

फडणवीस-पवार शपथविधी आणि खर्गे

2019 साली महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. फडणवीस-पवारांच्या या शपथविधीला मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या वादाला जबाबदार धरलं गेलं. संजय राऊत यांनी 'सामना'मधून नेहरू सेंटरमध्ये झालेल्या या वादाची इसनाईड स्टोरी सांगितली.

काँग्रेसमध्ये आता 'खर्गे पर्व', 24 वर्षांनंतर मिळाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष!

नेहरू सेंटरमध्ये वादाची ठिणगी

मल्लिकार्जुन खर्गे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं लक्ष सत्तेत राष्ट्रवादीला काय मिळतं? यावरच होतं. 22 नोव्हेंबरला नेहरू सेंटरमध्ये झालेल्या वाटाघाटीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचं अध्यक्षपद कुणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये, अशी भूमिका खर्गे वगैरे मंडळींनी घेतली. तिकडे खर्गे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतकं संतापलेलं मी प्रथमच पाहिलं. ते त्राग्याने टेबलवरचे कागद गोळा करून निघाले, त्यांच्यापाठोपाठ मी आणि प्रफुल पटेल धावत गेलो.

याच बैठकीत सुरूवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवारांनी सुचवलं, पण खर्गे-पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर बराच काळ अजित पवार त्यांच्या मोबाईलवर मान खाली घालून चॅटिंग करत होते, त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर स्विच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन राजभवनातील शपथविधी सोहळ्यात झाले, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी सामनामध्ये केला होता.

अजित पवारांकडून अभिनंदन

दरम्यान अजित पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष झाल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांचं मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान शरद पवार यांनी निकालाच्या दोन दिवस आधीच मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय होईल, असा विश्वास वर्तवला होता. काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे निवडून येण्याची शक्यता आहे, त्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव दिसतय. खर्गे व आम्ही सर्वजण संसदेत एकत्ररीत्या काम करत आहोत. त्यामुळे अनेक वर्षांपासून संघटनेत काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे अशी व्यक्ती त्याठिकाणी आल्यास त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल, असं शरद पवार म्हणाले होते.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Sanjay raut, Sharad Pawar