जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Supriya Sule : 106 वाले उममुख्यमंत्री 1 आमदार असलेल्या ठाकरेंना भेटतात सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

Supriya Sule : 106 वाले उममुख्यमंत्री 1 आमदार असलेल्या ठाकरेंना भेटतात सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

Supriya Sule : 106 वाले उममुख्यमंत्री 1 आमदार असलेल्या ठाकरेंना भेटतात सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बंडखोर आमदार आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे घराने राजकारणातील केंद्रबिंदू असल्याचे त्यानी बंडखोर आमदार आणि देवेंद्र फडणवीस बोलून दाखवले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै : शिवसेनेतून 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. दरम्यान महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर टिका करण्यास सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बंडखोर आमदार आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे घराने राजकारणातील केंद्रबिंदू असल्याचे त्यानी बंडखोर आमदार आणि देवेंद्र फडणवीस बोलून दाखवले आहे. (Supriya Sule)

जाहिरात

मुंबईतील घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम झाले आहेत का यासंदर्भातील प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर त्या म्हणाल्या आताचे सगळे निर्णय पाहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारुनच निर्णय घेतायत. हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसत आहे.

हे ही वाचा :  पुन्हा एकदा काय हाटील, काय समुद्र..एकदम ओक्के! शिंदे, फडणवीसांकडून आमदारांना हॉटेलवर बोलावणं

फडणवीस सुपर सीएम झालेत का? असे विचारताच खासदार सुळे म्हणाल्या कि, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारु शकता. ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला त्यादिवशीच सगळ्यांच्या आले आहे. याचबरोबर शिंदे यांना कदाचीत हे चालत ही असेल असं म्हणत सुप्रिया यांनी शिंदे आणि फडणवीस यांचा समाचार घेतला.

जाहिरात

बंड पुकारल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा अनेकदा उल्लेख करणाऱ्या शिवसैनिकांना माईक खेचल्याने स्वाभिमान जागा झाला नाही का? “मला हे कौतुकास्पद वाटतं बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. काय नवीन बदल झालाय मला काही समजेना, असे ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या कि, ठाकरे घराणे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू बनले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 106 आमदारांचे नेतृत्व करतात पण ते 1 आमदार असलेल्या राज ठाकरेंना भेटालया जातात ह्यातच सगळं काही आल्याचे त्या म्हणाल्या.

जाहिरात

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्था’वर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच भेट होणार होती. पण पावसामुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील आगामी घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

हे ही वाचा :  विदर्भातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू

जाहिरात

विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या मंत्रिमंडळात मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण ती चर्चा खोटी असल्याचं नंतर उघड झालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान फडणवीस-राज ठाकरे भेटीचं नेमकं गुपीत काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात