नागपूर 15 जुलै : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Updates) सुरू आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे नागपूरच्या बाबूळखेडा भागात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी घडली आहे. यात जीर्ण घरात भाड्याने राहत असलेल्या किशोर केसलवार यांचा मृत्यू झाला आहे, तर त्रिवेणी केसलवार जखमी झाल्या आहेत.
Rain Update: थोडी कळ सोसा; 2 दिवसानंतर राज्यात पाऊस घेणार विश्रांती; पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज
दरम्यान आजही नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना प्रशासनाने ऑरेंज अलर्ट (Orange Alert in Nagpur) दिला आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच या भागात पूर परिस्थिती कायम असताना थोड्या पावसाने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
VIDEO : पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, रस्त्यावर जमलेल्या गर्दीचाही थरकाप उडाला
गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातच्या अनेक भागात विशेषतः उत्तर, दक्षिण आणि सौराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संततधार पावसामुळे पूर्णा आणि अंबिका नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नवसारी शहराशिवाय बिलीमोरा आणि अन्य भागात गुडघाभर पाणी आहे. वांसदा तालुक्यात गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत ३९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain updates, Rainy season nagpur